मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु एक सकारात्मक बाब समोर आली ती म्हणजे सध्या मुंबईतील स्थिती नियंत्रणात असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याचे समजले जात आहे. परंतु जर कोरोना संबंधीच्या नियमांचे पालन केले नाही, तर पुढे लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घ्यावे लागू शकतील, असा इशारा पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिला आहे.
मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला आयुक्तांनी याबात माहिती देत सांगितले की, मुंबईतील कोविड चाचण्यांची संख्या वाढल्याने पॉझिटिव्ह केसेसमध्ये वाढ झाली आहे. आठ तारखेला 23 हजार कोविड 19 चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत दर शंभर चाचण्यांमागे केवळ सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.
त्यामुळे मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट सहा टक्के आहे. इतर ठिकाणचा पॉझिटीव्हिटी रेट मुंबईपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणी टाळेबंदी संदर्भात विचार होऊ शकतो. परंतु सध्या तरी मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्याने लॉकडाऊन होणार नसल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘रात्रीस खेळ चाले’ नंतर ‘या’ मालिकेचा येऊ शकतो सिक्वल
- ‘तो’ एकट्याच्या बळावर सामना जिंकून देऊ शकतो : लक्ष्मण
- रोहितबरोबर धवन नाही तर ‘हा’ खेळाडू ओपनिंगला येणार?
- कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचं थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय
- औरंगाबाद प्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज सुटीच्या दिवशीही सुरू राहणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

