🕒 1 min read
अहमदाबाद : अहमदाबाद येथे भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी हरवलं आहे. तर हा सामना जिंकून भारताने मालिका देखील ३-१ ने आपल्या खिशात घातली आहे. याबरोबरच भारताचे जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड मध्ये साउथम्प्टन होणार आहे.
त्याआधी भारताला इंग्लंडविरोधात पाच सामान्यांची टी20 सीरीज खेळायची आहे. सीरीजचे सर्व सामाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. या स्टेडियमवर दोन्ही टीम्सनी शेवटचे दोन टेस्ट मॅच खेळले होते. टी 20 सीरीजची पहिली मॅच शुक्रवारी खेळली जाणार आहे.
कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडिया ट्वेंटी-20 मालिकेत इंग्लंडचा सुफडा साफ करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. पण, भारतीय संघासमोर अडचणी वाढत चालल्या आहेत. आयपीएल २०२० गाजवल्यानंतर टीम इंडियाकडून ट्वेंटी-20 संघात स्थान पटकावणाऱ्या टी नटराजनचे या मालिकेत खेळणे, धोक्यात आले आहे. दुखापतीमुळे सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी गेला होता. पण, तो अजूनही तंदुरूस्त झालेला नाही.
त्यात वरूण चक्रवर्थी आणि राहुल टेवाटिया हे दोघेही BCCIच्या तंदुरूस्त चाचणीत नापास झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 मालिकेसाठी टीम इंडिया मुंबई इंडियन्सचा गोलंदाज राहुल चहर याचा संघात समावेश करणार असल्याची शक्यता आहे. टी नटराजन अजूनही पूर्णपणे तंदुरूस्त झालेला नाही. त्याच्या गुडघ्याला व खांद्याला दुखापत झाली आहे आणि तो १२ मार्चच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे.
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
महत्वाच्या बातम्या
- रोहितबरोबर धवन नाही तर ‘हा’ खेळाडू ओपनिंगला येणार?
- कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचं थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय
- औरंगाबाद प्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज सुटीच्या दिवशीही सुरू राहणार
- महेंद्र सिंग धोनी इज बॅक ; नेट्समध्ये हॅलिकॉप्टर शॉट्सची फटकेबाजी
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात फडणवीसांनी गंभीर आरोप केलेले धनंजय गावडे कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

