Share

कोरोना योद्ध्यांची लसीकरणाकडे पाठ, मात्र जेष्ठांचा उत्तम प्रतिसाद

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांना लसीसाठी प्राधान्य देण्यात आले. सुमारे २४ हजार जणांनी लसीसाठी नोंदणी केली पण गेल्या दोन महिन्यात केवळ १३ हजार ९९६ आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी लस घेतली आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यास प्राधान्य देत अवघ्या काही दिवसात ८ हजार ७५ जणांनी लस घेतली आहे.

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी केंद्र शासनाने दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.  पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर्सला लसीकरण करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात एक मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसह आजारी व्यक्तींना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे शहरात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शहरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असुन अद्याप पहिल्या टप्प्यातील शंभर टक्के आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी लस घेतलेली नाही. महापालिकेकडे सुमारे २४ हजार आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी नोंदणी केली होती. १० ते १२ हजार फ्रंट लाईन वर्कर म्हणजेच पोलिस, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, कोरोना काळात नागरिकांनाच्या मदतीला धावून जाणारे नागरिक यांना लसीकरण अपेक्षीत होते. मात्र १६ जानेवारी ते आठ मार्च दरम्यान ३५ हजार जणांना लसीकरण करण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!