Share

Russia Ukraine war: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांचे खाण्याचे हाल ; विद्यार्थिनी म्हणाली …

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO ( नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्ग नायझेशन) मध्ये सामील होऊ नये म्हणून रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. रशियाच्या बलाढ्य लष्करी ताकदी समोर युक्रेनचा निभाव लागणे कठीण आहे. तरी युक्रेन आपल्या परीने रशियाच्या बलाढ्य लष्कराचा सामना करीत आहे.

या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जगातील अनेक देशांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या परिणाम भोगावे लागत आहेत. भारतातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घ्यायला युक्रेन देशात जातात. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे या भारतीय विद्यार्थ्यांचे खाण्याचे, निवासाचे हाल झाले आहेत. याच बद्दल एका भारतीय मुलीने युक्रेनमध्ये होत असलेल्या त्रासाबद्दल स्थानिक वाहिनीशी बोलताना सांगितले कि, ” आम्ही ज्या बंकरमध्ये राहत आहोत ; त्या बंकरमध्ये आमच्याबरोबर अनेक विविध देशातील विद्यार्थी पण राहत आहेत. बंकरमध्ये निर्वासित झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आम्ही दिवसाला प्रत्येकी ३-४ चमचे भात खाऊ शकतो आहे. तसेच आम्हाला युक्रेनच्या लष्कराकडून त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे”. भारत सरकारने आतापर्यंत १५०० पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी परत आणले आहे.

महत्वाच्या बातम्या :   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!