🕒 1 min read
मुंबई : SECURITY AND EXCHANGE BOARD (SEBI) या संस्थेला आता नवीन अध्यक्ष मिळाला आहे. भारतीय शेअर मार्केटवर देखरेख ठेवणारी सर्वोच्च संस्था म्हणून SEBI ला ओळखले जाते. आता याच SEBI ला नवीन अध्यक्ष मिळाला आहे. आता सेबीचे विद्यमान अध्यक्ष अजय त्यागी यांची जागा माधवी पुरी बुच या घेणार आहेत.
केंद्र सरकारकडून भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डच्या (SEBI) माजी सदस्या माधवी पुरी बुच यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील भांडवली बाजाराची सर्वोच्च संस्था असणाऱ्या SEBI ची धुरा पहिल्यांदाच एक महिला स्वीकारणार आहे. SEBI चे विद्यमान अध्यक्ष अजय त्यागी यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांच्या जागी आता ‘पुरी बुच’ या महिलेची निवड झाली आहे. SEBI ची धुरा एका स्त्रीकडे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शांघाय येथील NEW DEVELOPMENT BANK येथे काम करणाऱ्या पुरी बुच आता भारतातील वायदे बाजारातील सर्वोच्च संस्था असणाऱ्या SEBI येथे अध्यक्षा म्हणून काम करणार आहेत. भारत सरकारने त्यांच्या सुरुवातीच्या ३ वर्षांच्या कार्यकाळाला परवानगी दिली आहे. पुरी बुच याआधी ICICI बँकमध्ये पण MD पदावर कमला होत्या. पुरी बुच यांचे प्रार्थमिक शिक्षण मुंबई आणि दिल्ली या दोन शहरात झाले असून त्यांनी IIT अहमदाबाद येथून MBA चे शिक्षण घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- संजय राऊत मोठा बॉम्ब टाकण्याच्या तयारीत! ट्वीट करत म्हणाले, “नुकताच खेळ…”
- Maratha Reservation: संभाजीराजे यांचे उपोषण मागे ; ‘या’ मुख्य मागण्या झाल्या मान्य
- ‘शिवाजी महाराज हे राष्ट्राचे एक प्रेरणा स्त्रोत’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
- ‘…तरच आंदोलन मागे घेणार, अन्यथा मागे हटणार नाही’; राजू शेट्टी यांचा इशारा
- कोश्यारींनी केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून पुणे महापालिकेत आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
