औरंगाबाद : शिवसेनेने कधीच मुस्लिमांना ठरवून विरोध केला नाही. शिवसेना ही सर्वसमावेशक असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. शिवसेनेने हिंदुत्वाचा विचार आणि आधार कधीही सोडलेला नाही. आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये सर्व जातीधर्मांना स्थान आहे. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे. जे या राष्ट्राला आणि मातृभूमीला मानतात, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतात, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते शनिवारी औरंगाबादमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
दरम्यान देशातील वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेकडून औरंगाबादेत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संजय राऊत या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. यानिमित्ताने ते औरंगाबादमध्ये आले आहेत. राज्यात महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रच काम करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे वेगवेगळे नसून एकच आहेत. शरद पवार हे महाविकासआघाडीचे प्रमुख आहेत, तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ज्यावेळी राज्यासंदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर महाविकासआघआडीतील तिन्ही पक्ष तो एकत्र मिळून घेतील, असे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. राज्यातील एसटी कामगारांचा संप कोण चिघळवतंय, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. ज्यांनी आजवर कामगारांच्या घाम आणि श्रमाचा नेहमीच तिरस्कार केला ते आज एसटी कामगारांच्या बाजूने उभे राहिले आहेत. मात्र, एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न यशस्वी ठरणार नाही. एसटी कामगारांचा प्रश्न हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून प्रलंबित असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दोन ट्रॅक्टरला लावली आग
- कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं- संजय राऊत
- देशाला धोका पोहोचवण्यासाठी नागरी समाजाच्या वापराची शक्यता- अजित डोभाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

