Share

देशाला धोका पोहोचवण्यासाठी नागरी समाजाच्या वापराची शक्यता- अजित डोभाल

Published On: 

नवी-दिल्ली : काल(१२ नोव्हें.) भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थींच्या ७३व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात असतांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी ‘युद्धाची नवी सीमा नागरी समाज असून त्याचा वापर करून देशहिताला धोका पोहोचवला जाऊ शकतो’, असे मत केले आहे.

यावेळी बोलत असतांना डोभाल म्हणाले की, ‘युद्धजन्य कारवायांची नवी आघाडी नागरी समाज हा आहे. सध्या राजकीय किंवा लष्करी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी युद्धे प्रभावी साधन बनली आहेत. परंतु ती खूप महागडी असतात किंवा परवडणारी नसतात. शिवाय, त्यांच्या निर्णयाबाबतही अनिश्चितता असते. परंतु आता एखाद्या राष्ट्राच्या हिताला धोका पोहोचवण्यासाठी नागरी समाज उद्ध्वस्त केला जाऊ शकतो, त्यात फूट पाडली जाऊ शकते किंवा त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो.’ तसेच एखाद्या देशाची अंतर्गत सुरक्षाव्यवस्था कोलमडली तर तो देश महान बनू शकत नाही. लोक सुरक्षित नसतील तर ते प्रगती करू शकत नाहीत आणि स्वाभाविकपणे देशही कधी पुढे जाऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’लोकशाहीचे मर्म मतपेटीत नाही, तर निवडणूक प्रक्रियेतून निवडलेल्या लोकांनी बनवलेल्या कायद्यांमध्ये असते. जेथे कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही, तेथे राष्ट्रउभारणीत बाधा येते. तसेच ज्या देशात कायदा राबवणारे कमकुवत, भ्रष्ट आणि पक्षपाती असतात तेथील नागरिकांना सुरक्षित वाटत नाही.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!