सिंधुदुर्ग : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
दरम्यान, याला टाळेबंदी म्हणण्यापेक्षा ‘ब्रेक द चेन’ नियमावली संबोधण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. याच्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. ‘ब्रेक द चेन नाही, चेक द ब्रेन हे मुख्यमंत्र्यांची अधिक योग्य आहे,’ अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
“Break the Chain”
Nah..
“Check the Brain”
sounds better for Maha CM n His Ministers!— Nitesh Rane (@NiteshNRane) April 13, 2021
पुढचे पंधरा दिवस कडक निर्बंध – उद्धव ठाकरे
‘आता कडक निर्बंधांची आवश्यकता आहे. जीव वाचवणं महत्वाचं आहे. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी मी निर्बंध पाळण्याचे हात जोडून आवाहन करत आहे. उद्या रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवस १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. याला जनता कर्फ्यू प्रमाणे जनतेनं मदत करावी. कोरोनाला मदत करणार की सरकारला मदत करणार हे जनतेनं ठरवायचं आहे.’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ब्रेक द चेन : राज्यात उद्यापासून पुढचे पंधरा दिवस आणखी कडक निर्बंध !
- उद्यापासून पुढचे पंधरा दिवस कडक निर्बंध; ‘या’ गोष्टी राहणार सुरु !
- मुख्यमंत्र्यांनी हवाईमार्गे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पंतप्रधानांना घातली साद
- पवारांचा रुग्णालयात गुढीपाडवा; अजितदादांनी घेतली भेट, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
- पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

