मुंबई : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीचे निमित्त साधून काँग्रेसने राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ दिन’ पाळला व आंदोलन केले. हे कायदे आणून शेतकरी व कामगारांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव आहे. कृषी कायद्याविरोधातील काँग्रसचे जनआंदोलन हा नव स्वातंत्र्यलढाच असल्याचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज राज्यभरात किसान मजदूर बचाओ दिवस पाळण्यात आला. राज्याच्या सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलने करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव जि. नाशिक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यांच्याबरोबर आ. हिरामण खोसकर, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, प्रदेश सरचिटणीस माजी खा. डॉ. उल्हास पाटील, माजी आ. अनिल अहेर, शिरीष कोतवाल, गुणवंत होळकर, जयश्रीताई पाटील, राजाराम पानगव्हाणे, प्रवक्त्या हेमलता पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, शेतकरी, कामगार विरोधी कायदे तातडीने रद्द करावे या मागणीसाठी काँग्रेस पक्ष दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे. महाराष्ट्रातील या मोहिमेचा शुभारंभ लासलगाव येथे आयोजित धरणे आंदोलन कार्यक्रमात करण्यात आला. राज्यातील प्रत्येक तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज बुलंद करत आहेत.
राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. ही संघर्षाची सुरुवात आहे, शेतकरी हितासाठी आम्ही अखंड कार्यरत राहू. मोठ्या संघर्षातून आणि प्रयत्नांतून बाजार समिती आणि हमीभाव ही व्यवस्था उभी राहिली. जुलमी कृषी कायद्यामुळे भाजप सरकार ही शेतकरी हिताची व्यवस्था मोडीत काढत आहे. कंत्राटी शेतीच्या माध्यमातून शेतक-यांना भूमिहीन करून उद्योगपतींचा फायदा करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे असे थोरात म्हणाले. काँग्रेसच्या आजच्या राज्यव्यापी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून शेतकरी कायद्याविरोधातील आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात व्हर्च्युअल किसान मेळावा घेण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी बोलतो ते विचारपूर्वकच बोलतो, चंद्रकांत पाटलांना विस्मरण झालं असेल’ ; शरद पवारांचा पलटवार
- बंडखोरी दाबून ठेवली तर स्फोट होतो; खा.विखेंच्या विधानाने उलट सुलट चर्चांना उधाण
- शरद पवारांची सिरमला भेट, म्हणाले मी लस घेतली…
- मार्कंडेय काटजूंचे वादग्रस्त वक्तव्य; हाथरस प्रकरणाचं फोडलं बेरोजगारीवर खापर
- उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

