Share

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मधील पंचरत्न पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ हा प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम लवकरच पुन्हा एकदा त्यांच्या भेटीस येणार आहे. याधीच्या या कार्यक्रमातील स्पर्धकांनी लोकांच्या मनात आपलसं स्थान निर्माण केल होत. यातील आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत यांनी त्यांच्या सुमधूर गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.

https://www.instagram.com/p/B8TotTRJ18P/?utm_source=ig_embed&ig_rid=5d20861d-6ea6-43e0-b568-f8908763ff2d

आता पुन्हा एकदा ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ हा कार्यक्रम एक नवीन रूपात येणार असून विशेष म्हणजे या कार्यक्रमात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मधील आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत आता परिक्षक म्हणून दिसणार आहेत. याबद्दल प्रथमेश लघाटे म्हणाला की, ‘लवकरच ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चं नवीन पर्व सुरु होणार आहे. यात माझ्यासोबत आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि रोहित राऊत  स्पर्धक म्हणून नाही तर ज्युरी म्हणून या कार्यक्रमाचा हिस्सा असणार आहोत.’

https://www.instagram.com/p/CLEZxsKpYCU/?utm_source=ig_web_copy_link

पुढे तो म्हणाला “ऑडिशनची प्राथमिक फेरी पार पडली असून, लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येईल. गेली बारा वर्ष आम्ही ५ जण एकमेकांच्या संपर्कात होतो. आता या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा आमची धमाल मजा मस्ती सुरु झाली आहे. आताची मुलं टॅलेंटेड तर आहेतच पण स्मार्ट देखील आहेत. त्यामुळे या पर्वात मजा येणार आहे. प्रथमच ज्युरीची भूमिका निभावत असल्यामुळे त्यासाठी आमची वेगळी तयारी चालू आहे. आम्ही खूप ज्युनिअर असलो तरी मागील १२ वर्षांचा अनुभव चांगला आहे. ऑडिशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुलांची गाणी आम्ही ऐकली. वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायला मिळाली. ‘ ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ आता पुन्हा एकदा येणार असल्याने प्रेक्षकांना देखील याची प्रचंड उत्सुकता लागली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!