Share

चौफेर टीकेनंतर अखेर खासगी रुग्णालयांना लस विकण्याचा निर्णय रद्द

Published On: 

नवी दिल्ली – कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडण्यासाठी लासिकरणावर भर दिला जात आहे. लसींचा व्यवस्थित पुरवठा होत नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंद पडत असले तरीही लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण सुरु होत आहे. देशात करोना लशींचा तुटवडा असला तरी भारतातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.

एका बाजूला हे सर्व होत असताना दुसऱ्या बाजूला एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.पंजाबमध्ये सरकारने खाजगी रुग्णालयांना लसी विकल्याचा आरोप अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे. प्रत्येक डोस मागे पंजाब सरकारला जवळपास ६०० रुपयांचे कमिशन मिळत असल्याचा देखील आरोप बादल यांनी केला आहे.

सरकार करोना लस ४०० रुपयांना विकत घेते. खासगी रुग्णालयांना प्रति डोस १ हजार ६० रुपयांना विकत होती आणि ६६० रुपये नफा कमवत होती. तर हीच लस खासगी रुग्णालय १ हजार ५६० रुपयांना विकून नफा कमवत होते, असा आरोप विरोधकांनी केला आहे. हा सर्व गंभीर प्रकार समोर आल्यानंतर कॉंग्रेसवर टीका होऊ लागली आहे. यानंतर आता कॉंग्रेस सरकार ताळ्यावर आले असून विकलेल्या लसी आता पुन्हा माघारी मागवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री लसीकरण मोहीमेसाठी गंभीर नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे पंजाबमध्ये काळाबाजार होत आहे. पंजाब सरकार केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या मोफत लसीही खासगी रुग्णालयांना विकत आहे.”, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!