मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या लाटेने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकाराना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मागील काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण झाली आहे.
यातच आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला देखील कोरोनाची लागण झाली होती. तिने स्वतः याबाबत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून माहिती दिली होती.काही दिवसातच कंगनाने कोरोनावर मात केली. कंगना कोरोनातून बरी होताच आपल्या मनालीतल्या घरी रवाना झाली आहे. थोड्या दिवसांपूर्वी तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले होते.
नुकताच कंगनाने कोविड-19 रिकव्हरीचा अनुभव शेअर केला आहे. 4 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये कंगनाने आपला कोरोनामुक्तीचा प्रवास सांगितला आहे. कंगना या व्हिडिओत म्हणते की, “आज मी तुमच्यासोबत कोरोना व्हायरसचा माझा अनुभव शेअर करणार आहे. साधारण सर्दी खोकल्यासारखा असणारा हा आजार मात्र रिकव्हरी दरम्यान माझ्यासोबत वेगळ्याच गोष्टी झाल्या. कोणत्याही घटनेनंतर आपले शरीर रिकव्हर होते तेव्हा ते सातत्याने होत असते.
https://www.instagram.com/tv/CPso8VABbdp/?utm_source=ig_web_copy_link
परंतु, कोरोना फॉल्स रिकव्हरी देत असतो, ही त्याची सर्वात धक्कादायक बाब आहे. जसं की माझा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर 2 दिवसांनंतर मी पूर्णपणे ठीक झाल्याचे मला वाटू लागले आणि कोणतेही काम सहज करु शकते असे वाटू लागले. परंतु, मी काही करण्यासाठी उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना मला उठवत नव्हते. हा व्हायरस जेनेटिकली मॉडिफाईड आहे. आपल्या शरीरातील रिस्पांस याने म्युट केला आहे.”
कोविड फॉल्स रिकव्हरी देत असल्याने अवयव निकामी होऊ लागतात आणि मृत्यू ओढावतो. “मित्रांनो, रिकव्हरी गरजेची आहे. मी अनेक डॉक्टरांशी या विषयावर बोलले आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की, विश्रांतीचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि या व्हायरसचा आपण सर्व मिळून सामना करुया. जय हिंद.”
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुजारा किंवा पंत असलेला संघ यशस्वी होऊ शकत नाही’
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

