Share

तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सीचा ‘हसीन दिलरुबा’ होणार ‘या’ तारखेला रिलीज

Published On: 

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या बेधडक आणि दमदार भूमिकामुळे प्रसिद्ध आहे.  तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. तीचा चाहता वर्ग देखील मोठा असून तिच्या नवीन चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण आतुर असतात. अशातच आता तापसीचा आणि विक्रांत मेस्सीचा ‘हसीन दिलरुबा’ सिनेमा २ जुलैला रिलीज होणार असल्याचे समजत आहे.

तापसी पन्नूने ही माहिती सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करत सांगितली आहे. ट्वीटमध्ये ती म्हणते की, ‘कहाणी आशिकाना, राज किलर, हसीन दिलरुबा लवकरच नेटफ्लिक्‍सवर,’ असे म्हणत तिने चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढवली आहे.

आनंद एल. राय या सिनेमाची निर्मिती करत आहेत. या सिनेमाचे शूटिंग गेल्यावर्षी जानेवारीत हरिद्वारमध्ये सुरू झाले होते. ‘हसीन दिलरुबा’चे बहुतेक शूटिंग हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये केले गेले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता, मात्र कोरोनाची परिस्थिति पाहता हा चित्रपट रिलीज करण्याची तारीख  पुढे ढकलावा लागली होती.

विक्रांत मेस्सीने यापूर्वी ‘छपाक’मध्ये काम केले आहे. विक्रांत मेस्सी याने मिर्झापुरमध्ये साकारलेली बबलू पंडित ही व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरली. तर तापसी पन्नू यापूर्वी ‘सांड की आंख’मध्ये भूमी पेडणेकरबरोबर दिसली होती. या दोघींच्याही कामाचे खूप कौतुक झाले होते. विक्रांत मेस्सी आणि तापसी प्रथमच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे यांच्या चाहत्या वर्गाला या चित्रपटाची ओढ लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!