मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे.नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पण कोरोनाच्या स्थितीमुळे बरेच आमदार गैरहजर आहेत. त्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. दरम्यान, आता पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येईल, असं बोललं जात आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात काहीशी नाराजी निर्माण झाली आहे.
आता, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधिवेशनाचा कालावधी वाढवून विधानसभेच्या अध्यक्षांची अशी मागणी केली आहे. अध्यक्षपदाबाबत काँग्रेसची आज एक बैठक पार पडली. यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमचा अध्यक्षपदाचा उमेदवारही ठरलेला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यात निर्णय होईल. मात्र, याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडला जावा हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी एक दिवसाने अधिवेशन वाढवावे अशी आमची मागणी आहे,’ असं भाष्य नाना पटोले यांनी केलं आहे.
काँग्रेसच्या नाराजीमुळे अधिवेशन वाढणार ?
विधानभवनात काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला काँग्रेस गट नेते बाळासाहेब थोरात, उर्जा मंत्री नितीन राऊत, कॅबिनेट मंत्री सुनिल केदार यांच्यासह इतर आमदार उपस्थितीत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चांगलेच भडकले होते.राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षावर नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान, यानिमित्ताने विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. त्यामुळे काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवून विधानसभा अध्यक्षांची नेमणूक केली जाईल का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- रणबीर कपुर आणि संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने आलिया भट्ट क्वारंटाईन
- पेट्रोल-डिझेल ७५ रुपयांवर येणार? अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत दिलं उत्तर
- वर्धापन दिनी राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना ऑडिओच्या माध्यमातून संदेश
- लॉकडाऊनमुळे शिक्षणाचा बोजवारा, भविष्याच्या चिंतेने विद्यार्थ्याची आत्महत्या
- ‘होय मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी कराच, मात्र त्यांना सोडू नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

