मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टिव्ह रुग्ण) संख्या एक लाखाच्या आत आली आहे. रविवारी ८२३२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७१ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५०९२ नवीन रुग्णांचे निदान झाले, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात रविवारी रोजी एकूण ९६ हजार ३७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान दुसरीकडे वाढती थंडी आणि सणासुदीच्या काळात राजधानी दिल्लीत कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांचा नवीन रेकॉर्ड झाला आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत ७,७४५ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या एका दिवसातील आतापर्यंतची सर्वात मोठी आहे.
दिल्लीच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून दररोज सहा हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, रविवारी (दि.८) दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. रविवारी कोरोनाचे ७,७४७ नवीन रुग्ण आढळले. तर ७७ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच, गेल्या २४ तासांत ६,०६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सनरायजर्स हैदराबादावर विजय मिळवत दिल्ली थेट फायनलमध्ये
- साधा प्रवक्ता बनवला असता तरी भाजपला मान वर काढू दिली नसती; शिवसेना नेत्याने व्यक्त केली खदखद
- …त्यामुळे यंदा दिवाळी साजरा न करता ‘त्यांच्या’ नावाने शिमगा साजरा करा!
- ‘आचार्य ठाकरे-पवार-थोरात मंदिर कधी सुरु करणार ?’, प्रकाश आंबेडकरांचा सवाल
- ‘अर्णबच्या केसाला धक्का जर लागला तर या देशातील जनता ते सहन करणार नाही’


