मुंबई : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.
अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती. काल, अर्णबच्या जामीनावर सुनावणी झाली मात्र तिथे देखील त्याला न्यायालयाने दिलासा न दिल्याने आज त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने मला मदत करावी, अशी मागणी अर्णब गोस्वामी यांनी तळोजाकडे येताना केली आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर अन्याय होत आहे, मला बेल द्या, असंही ते म्हणाले.
दरम्यान,अर्णबवरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी निषेध केला. तर, राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपतर्फे आंदोलन देखील करण्यात आलं. अर्णबची सुटका व्हावी म्हणून उपोषण करणारे भाजपचे आमदार राम कदम यांनी आता राज्य सरकारला इशारा दिला आहे.
महाराष्ट्र सरकार कान खोलकर सुन ले यदी #ArnabGoswami के सर के बालको भी धक्का लगा . तो अब यह देश की जनता बर्दाश्त नहीं करेगी अरे दुर्योधनका भी अहंकार नहीं टिका यह भूल मत जाना . बहोत जल्द तुम्हें इसकी क़ीमत चुकानी होगी #ArnabWeAreWithYou #EmergencyInMaharashtra #ArnabLifeIsInDanger
— Ram Kadam (@ramkadam) November 8, 2020
महाराष्ट्र सरकारने हे लक्षात ठेवावे की अर्णबच्या केसाला जरी धक्का लागला तरी या देशातील जनता ते सहन करणार नाही.दुर्योधनाचा अहंकार देखील टिकू शकला नाही हे विसरू नका. लवकरच याची मोठी किंमत चुकवावी लागेल असं कदम यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत ठाकरेंनी दिले महत्वाचे संकेत!
- लोकशाहीचं रक्षण करा आणि कधीही क्षुल्लक समजू नका! – अमृता फडणवीस
- नोटबंदी ही पंतप्रधानांनी एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता – राहुल गांधी
- कंगनाने साधला जो बायडेन यांच्यावर निशाणा; म्हणाली हे तर ‘गजनी’
- आयपीएल 2020च्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्ली-हैदराबाद भिडणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

