Share

…त्यामुळे यंदा दिवाळी साजरा न करता ‘त्यांच्या’ नावाने शिमगा साजरा करा!

Published On: 

मुंबई : देशात कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. यावेळी मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे व सार्वजनिक स्थळे बंद करण्यात आले होते. तर, जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अन्य काही धार्मिकस्थळे मंदिरे देखील खुली करण्यात आली असताना महाराष्ट्रात मात्र प्रार्थनास्थळे अजूनही बंद ठेवण्यात आले आहेत.

अद्यापही राज्य सरकारने मंदिरं व इतर प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी पावले उचललेली नाहीत. त्यामुळे भाजपसह वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. वारकरी संप्रदायातील संतवीर बंडातात्या कराडकर यांनी देखील राज्य सरकारच्या या कृत्याचं परखड भाषेत निषेध केला आहे. तर, हिंदूंचे देव निधर्मी आणि नास्तिक असुरांच्या ताब्यात असल्यामुळे यंदा कोणत्याही हिंदू बांधवाने दिवाळी साजरा न करता या असुरांच्या नावाने शिमगा साजरा करावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

राज्यात दारूची दुकाने, भाजी मंडई, पार्ट्या, मिटिंग सगळं सुरु आहे मात्र, मंदिरे, वाऱ्या, सप्ताहांना पूर्णपणे बंदी आहे अशी टीका त्यांनी केली आहे. त्यांनी दिवाळी साजरी न करण्याबाबत जाहीर केलेलं पत्र भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट केलं असून त्यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्रात_नरकासुरासह_असुरांचेच_राज्य ! महाराष्ट्राच्या ‘नरकासुरा’ने राज्यातील मंदिरे बंद करुन ठेवल्याने यंदा दिवाळी साजरी करु नये. तसेच गोड खायचे असेल तर या अधर्मी,नास्तिक असुरांचे चौदावे घालत खा असे आवाहन वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु संतवीर बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.” असं ट्विट आचार्य तुषार भोसले यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!