चिपळूण : शिवसेनेने भाजपची साथ सोडून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. तेव्हापासून भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडणं सुरूच ठेवलं आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केल्यानंतर भाजपने अधिकच तीव्र टीका सुरु केल्या आहेत.
लोकल, मंदिरं, शेतकरी मदत, अर्णब प्रकरण, सुशांतसिंह राजपूत प्रकरण, कंगना प्रकरण या व अशा अनेक घटनांच्या आधारे भाजपने शिवसेना व महाविकास आघाडी सरकारची कोंडी केल्याचं दिसून आलं आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर प्रतिहल्ला चढवला आहे. ‘ शिवसेनेने मला साधा प्रवक्ता केला असता तर भाजपच्या लोकांना मान वर काढू दिली नसती,’ अशी खदखद भास्कर जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.
‘2018 ची बंद झालेली फाईल उघडली तर भाजपचं पितळ उघडं पडेल. या भीती पोटीच महाराष्ट्रात भाजपची पळापळ सुरू आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. च्याशी मैत्री करायची त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भाजपची जून परंपरा आहे. ही परंपरा भाजप नेहमीच पाळत आली आहे. विधानसभा निवडणुकीत युती असूनही भाजपने आपल्याला कसा दगा दिला, हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे,’ अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
‘भाजपला मराठी माणसाचा द्वेष आहे. केंद्रातल्या नेत्यांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपची मंडळी अर्णब गोस्वामी यांना पाठिंबा देत आहे. कोण अर्णब गोस्वामी, कोण तो सुशांत सिंग राजपूत ? यांचं महाराष्ट्रात योगदान काय?’ असे म्हणत त्यांनी अर्णब गोस्वामीसाठी आंदोलन करणाऱ्या भाजपला भास्कर जाधव यांनी धारेवर धरलं.
‘ज्या माणसाने एका मराठी माणसाचे कष्टाचे पैसे थकवत त्याला जीवन संपवण्यास प्रवृत्त केले. त्याच्या तसा लेखी पुरावा आहे. असं असतानाही भाजपची मंडळी दिल्लीतल्या नेत्यांना खुश करायला अर्णबसाठी रस्त्यावर उरलेत हा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी लोकांचा अपमान आहे,’ अशी घणाघाती टीका केली.
महत्वाच्या बातम्या
- अन्वय नाईक आणि ठाकरेंमध्ये आर्थिक देवाणघेवाण ? निलेश राणेंचा गंभीर आरोप
- …त्यामुळे यंदा दिवाळी साजरा न करता ‘त्यांच्या’ नावाने शिमगा साजरा करा!
- ‘महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेलं महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान हे तोडून मोडून आपण उधळून लावलं’
- आघाडीत बिघाडी? राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, तर शिवसेना देखील भगवा फडकवण्यास सज्ज!
- ‘आचार्य ठाकरे-पवार-थोरात मंदिर कधी सुरु करणार ?’, प्रकाश आंबेडकरांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

