Share

‘आचार्य ठाकरे-पवार-थोरात मंदिर कधी सुरु करणार ?’, प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Published On: 

मुंबई : देशात कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. यावेळी मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे व सार्वजनिक स्थळे बंद करण्यात आले होते. तर, जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अन्य काही धार्मिकस्थळे मंदिरे देखील खुली करण्यात आली असताना महाराष्ट्रात मात्र प्रार्थनास्थळे अजूनही बंद ठेवण्यात आले आहेत.

भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने देखील मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन केलं होतं. खुद्द वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात प्रवेश करून मंदिरं उघडण्यासाठी वारकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केलं. मात्र अद्यापही राज्य सरकारने मंदिरं व इतर प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी पावले उचललेली नाहीत.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधताना, ‘दिवाळीनंतर मंदिरं खुली करणार असून त्यासाठी नियमावली बनवण्यात येईल. मंदिरासह इतर प्रार्थनास्थळांमध्ये ज्येष्ठ व्यक्ती, बालक जात असतात त्यामुळे तिथे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे आणि म्हणूनच जनतेच्या आरोग्यासाठी मला वाईटपणा घ्यावा लागत असेल तर मी वाईटपणा घेण्यास तयार आहे’ असं भाष्य केलं आहे.

यानंतर, प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडी आणि ह.भ.प यांचं काही वाकडं आहे का? असा सवाल करत मंदिरं लवकरात लवकर खुली करावीत अशी मागणी केली. ‘आचार्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आचार्य उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सत्तेत सोबत असणारे काँग्रेसचे आचार्य बाळासाहेब थोरात यांचं आणि ह.भ.प म्हणजेच हरिभक्त पारायण यांचं काही वाकड आहे का? हरिभक्तांनी मंदिर खुली करण्याची मागणी केली म्हणून आचार्यांना राग आलाय का? वंचित आघाडीला सोबत घेतलं म्हणून राग आलाय का? असे खोचक सवाल विचारून त्यांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!