Share

सनरायजर्स हैदराबादावर विजय मिळवत दिल्ली थेट फायनलमध्ये

Published On: 

दुबई : आयपीएल 2020च्या तेराव्या हंगामातील काल  दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना झाला. या सामन्यात दिल्लीने सनरायजर्स हैदराबादला पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता १० नोव्हेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली संघात आयपीएल २०२०चा अंतिम सामना होणार आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफ फेरीसाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या चार टीम पात्र झाल्या होत्या. एका बाजूला मुंबई इंडियन्सने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला होता.  तर पराभूत झालेल्या दिल्ली कॅपिटल्सला नियमाप्रमाणे क्वालिफायर टू मॅच खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीच सोन करत दिल्लीने काल विजय मिळवला आहे.

आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासात पाहिले तर, दिल्लीने अंतिम सामन्यात धडक मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापुर्वीच्या एकाही हंगामात दिल्लीने ही मजल माजली न्हवती . तर दुसऱ्या बाजूला मुंबई संघाची अंतिम सामन्यात मजल मारण्याची ही सहावी वेळ आहे. विना प्रेक्षकांची रंगलेली २०२० ही आयपीएल ट्रॉफी, कोणता संघ घेऊन जाणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!