Share

कोरोना हरणार ! पुण्याची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या पाच हजारांच्या आत, मात्र…

Published On: 

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये नव्या कोरोना रुग्णांचा आकडा हा १ हजारांच्या खाली आहे. तर, पुण्यात या लाटेतील नीचांकी १८० रुग्णांची नोंद एका दिवसात करण्यात आली होती. मात्र, या आकड्यात काहीशी वाढ झाली असल्याने ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा आटोक्यात येण्यास अधिक वेळ लागत आहे.

दरम्यान, आता शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही पाच हजारांच्या आत आली आहे. पुणे शहरात आज ३४९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ६९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ८४२ इतकी झाली असून ७२१ रुग्ण हे गंभीर आहेत. सध्या १ हजार ३७२ रुग्ण हे ऑक्सिजनच्या साहाय्याने उपचार घेत आहेत. तर, आज कोरोनामुळे २१ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!