Share

मुंबईचा पुढील महापौर भाजपचा आणि उपमहापौर ‘आरपीआय’चाच होईल- आठवले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- पुढील दोन वर्षात मुंबई महापालिका निवडणूक होत असून आम्ही ही निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच या निवडणुकीत भाजप आणि आम्ही एकत्रच राहू. मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढेल. पण काँग्रेस स्वतंत्र लढण्याची शक्यता आठवलेंनी व्यक्त केलीय. तसंच आम्ही जिंकलो तर महापौर भाजपचा आणि उपमहापौर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. ते आज नागपुरात बोलत होते.

पुढील विधानसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढले तर आमचा मार्ग साफ आहे. उद्धव ठाकरे म्हणतात 25 वर्षे आम्ही सत्तेत राहू, मग आम्ही काय करायचं? असा मिश्किल सवाल केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी विचारला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पुढील 5 वर्षे नाही तर 25 वर्षे चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यावर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना जे कायद्यात नको आहे ते त्यांनी सांगावं, त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली जात असल्याचंही आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!