नवी दिल्ली : लॉकडाऊन काळात सायबर क्राईम बराच वाढला आहे. अशातच एक घटना समोर येत आहे. एका आरोपींनी एका रिटायर्ड अधिकाऱ्यांच्या खात्यातून तब्बल 40 लाख रुपयांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. सायबर क्राईमसंबंधीची तक्रार पोलिसांनी दाखल केली आहे.
परंतु पीडित व्यक्तीला यातील एक रुपयाही परत मिळाला नसल्याने ते न्यायासाठी भटकत आहेत. न्यायासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं असून संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पीएमओकडून त्यांना प्रतिक्रियाही आली आहे.
बिहारमधील सासाराम येथे राहणारे रिटायर्ड अधिकारी प्रकाश चंद्र अखौरी नाल्कोमध्ये एचआरडी पदावर तैनात होते. त्यांच्या बँक खात्यातील तब्बल ४० लाख रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरी केलेल्या या पैशातून आरोपींनी बनारसमधील एका ज्वेलरी दुकानातून ऑनलाईन पेमेंटद्वारे सोन्याची खरेदी केली.
पोलिसांनी या प्रकरणातील चार सायबर आरोपींना अटक केली आहे. अटक झालेले आरोपी पीडित व्यक्तीच्या जवळचेच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी दोन जण त्यांचे भाडेकरू होते. पीडित रिटायर्ड अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या दोन मुली परदेशात राहतात. सासाराम येथे ते एकटेच राहतात. अशात या आरोपींची त्यांच्यावर नजर असून त्यांना असुरक्षित वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- खोटी GST बिले सादर करून फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या लेखापरिक्षकाला अटक
- ‘मी कंगाल आहे माझी सगळी संपत्ती ‘या’ व्यक्तीने लुबाडली’, राखी सावंतचा खळबळजनक दावा
- देशातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्या मल्ल्याची आर्थिक नाकेबंदी
- महाराष्ट्रात लोकशाही संपली असून उद्धव ठाकरेंची हुकूमशाही सुरू आहे; भाजपची टीका
- भारतात कोविडग्रस्तांची संख्या 3.6 लाखांहून खाली आली?


