Share

जयंतराव लाळघोटेपणाची हद्दचं झाली; भाजपची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा काल 80 वा वाढदिवस झाला. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, देशाचं संरक्षणमंत्री पद, कृषीमंत्रीपद अशी अनेक महत्त्वाची पदं सांभाळली आहे. सध्या शरद पवार हे राज्यसभा खासदार आहेत. महाराष्ट्रात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामध्ये त्यांनी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली होती. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार म्हणजेच शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी यांची मूठ बांधण्यात आली. काल शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. काल 80 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल जयंत पाटील यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम-सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावं काढली तर त्यात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज येतात. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांचे स्थान आहे. आज त्या पंगतीत आपले नेते शरद पवार साहेबसुद्धा आहेत. असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं.

जयंत पाटील यांच्या या ट्विटनंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत जयंत पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे. जयंतराव, लाळघोटेपणाची हद्द झाली, आपल्या नेत्याची स्तुती करताना राष्ट्र पुरुषांचा अपमान होणार नाही एवढी तरी काळजी घ्या… असं ट्विट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी शरद पवार नावाचा करिष्मा बघितला आहे. स्वतःला देशाचे मालक समजणाऱ्या लोकांचा ‘बाप आला‘ असे म्हणत लोकांनी साहेबांचे राज्यभर स्वागत केले, त्यांचे नेतृत्व स्वीकारले. ‘शरद पवार जी कि राजनीती का दौर अब शुरू हुआ है’ हे विरोधकांनी जाणावे, असा इशाराही जयंत पाटील यांनी काल दिला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!