🕒 1 min read
नवी दिल्ली: सणासुदीच्या काळात वाहन खरेदीवर भरघोस सूट दिली जाते. मात्र यावर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या काळामध्ये उद्योग व्यवसायांन आर्थिक फटका बसला त्यामुळे वाहन उद्योग देखील मंदावला होता. तर अनलॉक प्रक्रीये दरम्यान हळूहळू अर्थचक्र पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर वाहन उद्योग त्याचबरोबर वाहन खरेदी देखील होत आहे.
सणासुदीच्या काळात विविध कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी विविध ऑफर्स आणल्या होत्या. अनेक ऑफर्स, डिस्काउंट्स असल्याने, फेस्टिव्ह सीजनमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणात गाड्यांची खरेदी करतात. मात्र सध्या एकीकडे इंधन दरवाढ आणि दुसरीकडे या वाहन खरेदीवरील ऑफर्स, डिस्काउंट्स विरोधभास ठरत आहेत. मात्र आता इंधन दरवाढीच्या तोंडावर इंडियन ऑईल कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे.
सध्या पेट्रोलचे मूळ भाव कमी आणि सरकारी कर जास्त अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पेट्रोल आता थेट शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. अशावेळी इंडियन ऑईल कंपनीने ग्राहकांसाठी खास स्कीम लागू केली आहे. ज्याद्वारे ग्राहकांना थेट SUV कार जिंकण्याची संधी आहे.
दि. 4 डिसेंबर 2020 पासून दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. ही योजना लागू झालेली आहे. त्यामध्ये पेट्रोल किंवा डीझेल भरून ग्राहकांना कार जिंकण्याची संधी असेल. त्यासाठी फ़क़्त 400 रुपयांचे इंधन भरून एक कुपन मिळेल. एक्स्ट्राप्रीमियम आणि एक्स्ट्रामाइल हे इंधन भरणाऱ्यांनाही ही स्कीम लागू असेल.
त्यासाठी ग्राहकांना खूप काही करायचे नाही. पेट्रोल भरल्याचे प्रिंटेड बिल त्यासाठी आवश्यक आहे. ग्राहकांनी हे बिल घेऊन त्यावरील बिल नंबर आणि डीलर कोड यांचा एसएमएस पाठवायचा आहे. त्यासाठी ‘डीलर कोड बिल नंबर बिलावरील रक्कम’ हा मेसेज 90521 55555 यावर पाठवायचा आहे. बिलावर 6 अंकी डीलर कोड असतो.
दि. 31 डिसेंबर 2020 या दिवशीच्या मध्यरात्रीपर्यंत ही स्कीम खुली आहे. एक ग्राहक एका मोबाईल नंबरवरून दिवसातून दोनवेळा यासाठी मेसेज पाठवू शकतो. मात्र, त्यासाठी बिल जपून ठेवावे लागणार आहे. बिल हरवल्यास किंवा त्याचे ईबिल उपलब्ध नसल्यास बक्षीस अजिबात मिळणार नाही.
अशी आहेत ‘भरो फ्यूल जीतो कार’ योजनेतील बक्षिसे
– एक एसयूवी (मेगा लकी ड्रॉ)
– चार कार (मेगा लकी ड्रॉ)
– 16 बाइक्स (मेगा लकी ड्रॉ)
– प्रत्येक आठवड्यात 25 विजेत्यांना 5 हजार रुपयांचे मोफत इंधन
– प्रतिदिन 100 एक्स एक्स्ट्रारिवार्ड्स मेंबर्स (एक्स्ट्रारिवार्ड्स प्रोग्राममधील सहभागी ग्राहक) यामधील विजेत्यांना 100 रुपये किमतीचे मोफत इंधन
महत्वाच्या बातम्या
- खोटी GST बिले सादर करून फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या लेखापरिक्षकाला अटक
- ‘मी कंगाल आहे माझी सगळी संपत्ती ‘या’ व्यक्तीने लुबाडली’, राखी सावंतचा खळबळजनक दावा
- देशातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्या मल्ल्याची आर्थिक नाकेबंदी
- महाराष्ट्रात लोकशाही संपली असून उद्धव ठाकरेंची हुकूमशाही सुरू आहे; भाजपची टीका
- भारतात कोविडग्रस्तांची संख्या 3.6 लाखांहून खाली आली?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
