🕒 1 min read
मुंबई: राज्यात आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.
“शिवतीर्थावर यापुढच्या दसरा मेळाव्याची सुरुवात माझ्या जमलेल्या तमाम हजारात आणि खवातीनांनो या वाक्याने होणार बहुदा.”, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. तसेच महाविकास आघाडीत AIMIMदेखील सामील होणार? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे वृत्त आहे. भाजपला रोखण्यासाठी उद्या पाकिस्तानमधील मुस्लिम लीग आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीत सामील करून घेतल्याची बातमी आली तरी आश्चर्य वाटणार नाही. असेही अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
शिवतीर्थावर यापुढच्या दसरा मेळाव्याची सुरुवात माझ्या जमलेल्या तमाम हजारात आणि खवातीनांनो… या वाक्याने होणार बहुदा.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 19, 2022
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत माझी एक बैठक झाली असून तेव्हा आम्हीच त्यांना प्रस्ताव दिला की, एमआयएम काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार आहे. आम्ही ते काय करतात ते पाहू, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. दरम्यान स्वतःला सेक्युलर मानणाऱ्या या पक्षांनी शिवसेनेची साथ दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात उभे राहण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला होता. त्यामुळे आता आम्हीही त्यांना प्रस्ताव दिला असून भविष्यात यांनी आमच्यावर आरोप देण्यापूर्वी विचार केला पाहिजे की, भाजपला दूर राहण्यासाठी एमआयएम कुणासोबतही जाण्यास तयार आहे. असेही जलील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
