Share

पतीच्या दिर्घायुष्यसाठी अभिनेत्री अभिज्ञा भावेने घातले विठ्ठलाकडे साकडे..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तिचा पती मेहुल पै यांनी रविवारी श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. वर्षभरापूर्वी अभिज्ञा आणि मेहुल या दोघांचा लग्न झाला होता. लग्नानंतर काही महिने सुखी संसार सुरु असताना मेहुलला कॅन्सरने गाठले अन् सुखी संसारात मिठाचा खडा पडला. या बातमीने मेहुल निराश झाला होता. मात्र,अभिज्ञा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. कॅन्सरवर उपचार सुरु झाले आणि उपचाराला मेहुल चांगला प्रतिसाद देऊ लागला. हळूहळू या आजारातून मेहुलची सुटका होत आहे.

या आजारातून मेहुल पूर्ण बरा व्हावा आणि त्याला दिर्घायुष्य मिळावे, यासाठी अभिज्ञा रविवारी मेहुलसह पंढरपूरात आली होती. त्या दोघांनी श्री विठ्ठल रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले. दोघांनी देवासमोर साष्टांग दंडवत घातला. विठुरायाचे दर्शन घेऊन दोघेही खूपच भारावून गेले होते. बा…विठ्ठला माझ्या पतीवर कृपादृष्टी ठेव, त्याला निरोगी दीर्घायुष्य दे, असे साकडे अभिज्ञा यांनी श्री विठ्ठल रखुमाईला घातले. देवाच्या दर्शनानंतर दोघांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. या दांपत्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी श्रीं ची मूर्ती देत सत्कार केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!