🕒 1 min read
मुंबई : ‘द काश्मिर फाइल्स’ हा चित्रपट १९९० च्या काळात काश्मिरी पंडितांवर झालेल्या भीषण अन्याय आणि अत्याचारावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे, अशातच या चित्रपटाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेलंगणामधील एका चित्रपटगृहात ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाचे स्क्रीनिंग सुरू असताना, काही अज्ञात व्यक्तींनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचे वृत्तसमोर आले आहे. या घटनेनंतर चित्रपटगृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच मारहाणीची घटना झाल्याचे वृत्तही समोर आले आहे. या घटनेने सध्या सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
Two people thrashed by crowd for chanting #PakistanZindabad during screening of #TheKashmirFiles at Natraj Theatre in #Adilabad, #Telangana.
No complaint lodged. Those two are absconding. pic.twitter.com/aJLjwOimkn
— Siddhu Manchikanti (@SiDManchikanti) March 18, 2022
हा सगळा प्रकार तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात घडला आहे. दिनांक १८ मार्च रोजी काही समाजकंटकांनी चित्रपटगृहातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी भारताविरोधी घोषणा देत पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले होते. या सगळ्या प्रकाराने संतप्त झालेल्या लोकांनी या समाजकंठकांना चांगलाच चोप दिला आहे. याबाबत चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली मात्र त्याआधीच या अज्ञातांनी त्याठिकाणाहून पळ काढला. आता सिनेमागृहामधील सीसीटीव्ही फुटेजवरून या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
या सगळ्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना पोलिसांनी आम्ही या घटनेचा तपास करत असून आत्तापर्यंत याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर काही लोक हेतुपूर्वक तेढ निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
