Share

“समाजवादी पक्षाचे अबू असिम आजमी हे समविचारी असल्यामुळे…”, भातखळकरांचा सुप्रिया सुळेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी तयार आहोत. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले दिसत आहे. या विधानामुळे भाजप आणि शिवसेना पुन्हा एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. यावरच खासदार सुप्रिया सुळे यांनी समविचारी पक्ष एकत्र आल्यास आनंदाचीच गोष्ट असल्याचे म्हटले आहे. आता यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत प्र्त्युत्तर दिले आहे.

“समाजवादी पक्षाचे अबू असिम आजमी हे समविचारी असल्यामुळे आधीपासूनच महाविकास आघाडी सरकारमध्ये आहेतच की. मग AIMIMची कशाला अडचण होणार आहे?”, असा टोला अतुल भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया देत म्हटले की, राजकीय क्षेत्रात कोणाला एकत्र काम करायचे असेल तर त्यांनी एकत्र आले पहिजे. समविचारी पक्ष सगळ्यांनी एकत्र येणं ही आनंदाची गोष्टी आहे. दरम्यान त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, विकासकामासाठी सर्वजण एकत्र येत असेल तर हे सर्व नागरिकांसाठी आणि राज्यासाठी उत्तम आहे. मात्र शिवसेना या विषयावर चांगलीच आक्रमक झाली आहे. काही नेत्यांनी या विषयावरून भाजपला वेठीस धरले आहे. शिवसेनेबाबत बोलताना मात्र सुप्रिया सुळेंनी मला विषय माहिती नाही म्हणत सावधपणा घेतला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!