🕒 1 min read
जळगाव : भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते भविष्य वर्तवितात, मागे तर चंद्रकांत पाटलांनी अनेक तारखा दिल्या होत्या, आता रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे की अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्याचा अर्थ असा आहे की रावसाहेब दानवे हे आमदारांना कुठे तरी भेटली असतील. परंतु भारतीय जनता पार्टीचे हे मनोरंजन आहे आणि स्वप्न पाहणं आहे सध्या तरी कोणत्याही आमदारांची पक्षी बदलण्याची मनस्थिती दिसत नाही. महाविकास आघाडीतील एकही आमदार फुटणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
दरम्यान रावसाहेब दानवे म्हणाले होते कि, महाविकास आघाडीचे २५ नाराज आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले होते कि, भाजपचेच २५ आमदार नाराज आहेत आणि फुटणार देखील आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
