मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं. शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की, आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.
दरम्यान, देशातील प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांनी आजच्या भारत बंदला पाठींबा दिला आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टी देखील मागे नाहीये. अभिनेता हेमंत ढोमे यांनी देखील शेतकरी आंदोलन आणि भारत बंदला पाठींबा दिला आहे. ‘बळीराजा उद्वीग्न झालाय, तो ज्याने समाधानी होईल ते व्हायला हवं! पोशिंद्याच्या लढ्यात पक्ष, राजकारण या पलिकडे सारासार विचार होणं गरजेचं आहे! त्याला वारंवार रस्त्यावर उतरावं लागणार नाही यासाठी योजना हव्यात! माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच’! अस म्हणत हेमंत ढोमे यांनी शेतकऱ्यांना पाठींबा दिला आहे.
बळीराजा उद्वीग्न झालाय, तो ज्याने समाधानी होईल ते व्हायला हवं! पोशिंद्याच्या लढ्यात पक्ष, राजकारण या पलिकडे सारासार विचार होणं गरजेचं आहे! त्याला वारंवार रस्त्यावर उतरावं लागणार नाही यासाठी योजना हव्यात!
माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!#Isupportfarmerprotest #शेतकऱ्यांचालढा— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) December 7, 2020
दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक उद्या म्हणजेच, 9 डिसेंबरला होणार आहे. असं म्हटलं जात आहे की, यावेळी शेतकरी आपली मागण्यांवर ठाम राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे केंद्र सरकार नमतं घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील- संजय राऊत
- ‘मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत,डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत’
- अरविंद केजरीवालांना नजरकैद केलंय, आपचा गंभीर आरोप…
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधीनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- टेनिसपटू सानिया मिर्झा करतीये अभिनयात पदार्पण झळकणार ‘या’ सीरिजमध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

