लातूर : राज्यात तसेच जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. मात्र, त्याला लोकांचा प्रतिसादच नसेल तर नुसतेच उपाययोजना राबवून काहीही उपयोग होणार नाही. अशीच परिस्थिती सध्या लातूरमध्ये बघायला मिळत आहे.
कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे पाहून लातूर प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. शहरात आता रात्र बंदी सुरू करण्यात आली आहे. मात्र, लोकांचा निष्काळजीपणा वारंवार दिसून येत आहे. लोकांनी यावेळेस कोरोनाचे तेवढे गांभीर्य घेतल्याचे दिसत नाहीये. मास्क न वापरता येथील लोक बिनधास्त बाहेर फिरताना दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अशा लोकांकडून दंड आकारण्यात येत आहे. मागच्या १९ दिवसांमध्ये एकूण सव्वापाच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लातूरमध्ये गर्दीचे ठिकाणं दुर्लक्षित असल्याचं दिसत आहेत. फक्त मास्क न वापरणाऱ्या लोकांवरच कारवाई होताना दिसत आहे. कोचिंग क्लासेसवर कारवाई करण्यात आली. पण त्याचा फारसा काही परिणाम झालेला दिसत नाही. तसेच मंगल कार्यालयांवरही कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
एकूणच लोकांचा फारसा प्रतिसाद या वेळेस दिसून येत नाहीये. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. लोकांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात येत असली तरी तेवढं सहकार्य दिसत नाहीये.
महत्वाच्या बातम्या
- आमिर खान पाठोपाठ ‘या’ अभिनेत्यानेही केला सोशल मीडियाला ‘गुडबाय’
- इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतींबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठ विधान
- ३१ मार्चपर्यंत ट्रेन रद्द ? रेल्वे मंत्रालयाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण
- प्रेमाचा करुण अंत! रेल्वेखाली उडी घेऊन युवक-युवतीची आत्महत्या
- अमेझॉन प्राइमचा ‘पीकासो’ चा ट्रेलर प्रदर्शित; प्रसाद ओक प्रमुख भूमिकेत


