नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा एकदा वेगाने वाढत चालल्याने देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाउन संबंधी यापूर्वी सोशल मिडीयावर अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणी अनुचीत प्रकार घडले होते. त्यातच आता भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व ट्रेन रद्द केल्याचे वृत्त सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून त्यावर अखेर निवेदनाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
याबाबत ३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द करण्यात आल्याचे वृत्त रेल्वे मंत्रालयाने तथ्यांवर आधारित नसल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्रालयाने सोमवारी एका निवेदनाद्वारे, सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेले वृत्त दिशाभूल करणारे आहे. चुकीची बातमी क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल केल्या जात आहेत.
व्हायरल होणारा व्हिडिओ गेल्या वर्षीचा असून चुकीच्या संदर्भासह तो व्हायरल होत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) या संस्थेनेही स्पष्टीकरण दिले आहे. ३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतलेला नाही.
एक खबर में दावा किया जा रहा है कि 31 मार्च तक सभी ट्रेनें रद्द कर दी गई हैं। #PIBFactCheck: यह खबर पुरानी है। @RailMinIndia ने 31 मार्च, 2021 तक ट्रेन रद्द करने का यह फैसला नहीं लिया है। इस पुरानी खबर को गलत संदर्भ में साझा किया जा रहा है। pic.twitter.com/YcZ8Za9Vj1
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 15, 2021
चुकीच्या संदर्भासह जुनी बातमी शेअर केली जात असल्याचे पीआयबीकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द केल्याचे वृत्त खोटे असून अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाउन संबंधी होत असलेल्या अशा माहितीवर लोकांनी विश्वास न ठेवता त्याची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय?
- दडपशाही! शरद पवारांच्या बारामतीला निघण्यापूर्वीच साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार

