मुंबई : अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ यांच्याकडून आज त्यांचा पहिलाच मराठी डायरेक्ट टू सर्विस ऑफरिंग ‘पिकासो’ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक, समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम मुख्य भुमिकेतून झळकणार आहेत.
उराशी मोठी स्वप्ने बाळगणारा मुलगा आणि कलेची ताकद दाखवणाऱ्या ‘पिकासो’ या चित्रपटाची कथा एका घरातील मद्यपी वडील आणि त्यांच्या मुलाची मोठी स्वप्ने या विषयावर आधारीत आहे. मात्र यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजेच कलेची ताकद आणि मुलाने उराशी बाळगलेले स्वप्न हे दशावताराच्या वेळी करण्यात येणारा मेकअप ते पिकासोच्या गॅलरीत बसून चित्र काढण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण होणार का हे सांगणारा आहे.
‘पिकासो’ सिनेमाचे दिग्दर्शन आणि सह लेखन अभिजीत मोहन वारंग तर सह लेखक हे तुषार परांजपे यांनी केले आहे. येत्या १९ मार्च पासून या सिनेमाचा वर्ल्ड प्रिमिअर अॅमेझॉनवर सर्वांना पहता येणार आहे. ‘पिकासो’ हा चित्रपट हा दशावताराला अस्सल व मूळ स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न आहे.
महत्वाच्या बातम्या
- रुग्णालयात सर्जन अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप
- स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय?
- अखेर नको तेच झाले ; महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात, केंद्राचे राज्य सरकारला पत्र
- राष्ट्रवादीचे बॅनर, ‘सब जगह से पड रही है मार, धन्यवाद मोदी सरकार!’
- सचिन वाझे प्रकरणी अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

