नवी दिल्ली: प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सुरुवातीला इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे या कार खरेदि केल्या जात नव्हत्या मात्र आता , कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील नेहमीच इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरला प्रोत्साहन देत असतात. यावेळी देखील पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी व्हावा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे प्रयत्न सुरू आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीनं गडकरी प्रयत्नशील आहेत.
यासंदर्भात लोकमतच्या ‘महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०२०’ सोहळ्यात गडकरींनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांइतक्याच असतील, असं गडकरींनी सांगितलं. सध्या जिथे ५० हजार रुपयांचं इंधन लागतं, त्याच ठिकाणी अवघ्या २ हजारांची वीज लागेल, असं ते पुढे म्हणाले. एका चार्जमध्ये दिल्लीहून बलियाला जाऊन परतणारी इलेक्ट्रिक बस आणि कार तयार करू, असा दावादेखील त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीचे बॅनर, ‘सब जगह से पड रही है मार, धन्यवाद मोदी सरकार!’
- दडपशाही! शरद पवारांच्या बारामतीला निघण्यापूर्वीच साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
