मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमीर खानने अचानक सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली आहे. सुपरस्टारने आपल्या शेवटच्या इंस्टा पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे. ‘माझे मन तुमच्या प्रेमाने भरले आहे.’ त्याने या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अभिनेत्याचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत.
आमिरच्या पाठोपात आता सुशांत सिंह यांनी देखील सोशल मीडियाला ‘गुडबाय’ करत असल्याचं जाहीर केलं. सुशांतने ‘द लेजंड ऑफ भगत सिंग’, ‘सत्या’, ‘दम’, ‘लक्ष्य’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. तर ‘सावधान इंडिया’ या क्राइम शोचं सूत्रसंचालनही त्याने केलं होतं
सुशांतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आणि सोशल मीडिया सोडत असल्याचं चाहत्यांना सांगितलं. त्यानंतर सुशांतचा ट्विटर अकाऊंट बंद झाल्याचं पाहायला मिळालं. ‘हा अकाऊंट अस्तित्वात नाही’ असा संदेश त्यावर येऊ लागला. ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून ब्रेक घेतोय. रिबूट करायची गरज आहे’, असं त्याने अकाऊंट बंद करण्यापूर्वी ट्विट केलं होतं. त्यानंतर हीच पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली.
महत्वाच्या बातम्या
- रुग्णालयात सर्जन अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप
- स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय?
- अखेर नको तेच झाले ; महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात, केंद्राचे राज्य सरकारला पत्र
- राष्ट्रवादीचे बॅनर, ‘सब जगह से पड रही है मार, धन्यवाद मोदी सरकार!’
- सचिन वाझे प्रकरणी अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

