Share

‘हे’ १०० विधानसभा मतदारसंघ काबीज करण्याची राष्ट्रवादीने सुरु केली तयारी

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. यातच आता राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा करण्याची चढाओढ लागल्याच पाहायला मिळत आहे. सत्ताधारी प्रमुख तीन पक्षात सध्या शीतयुद्ध सुरु असून आता तीनही पक्ष आपापल्या पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करू लागले आहेत.

शिवसेना-राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे सांगत आहेत.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आता एक लक्ष्यवेधी भूमिका घेतली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक संघटन हे प्रत्येक मतदारसंघात मजबूत करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने ‘सुपर १००’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून यासाठी ३४ विधानसभा निरीक्षक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात  आली आहे. राज्यातील युवकांची बांधणी करण्याच्या हेतूने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने विधानसभा निरीक्षक पदी नवनिर्वाचित ३४ पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

‘सुपर१००’ या मोहिमेअंतर्गत राज्यातील १०० विधानसभा मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. या मतदारसंघात पक्षाचं संघटन मजबूत करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरुण पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघात जाऊन तरुण-तरुणींना पक्षात सहभागी करवून घ्यायचे आहे. मेळावे, मोर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संघटन वाढवण्यावर भर देण्याचं काम करायचं आहे. तसेच इतर पक्षातील किंवा पक्षांशी संबंध नसलेल्या तरुणांना राष्ट्रवादीकडे आकर्षित करण्याची तसेच प्रत्येक विधासभेत सोशल इंजिनीयरिंगचा प्रयोग राबवण्याची जबाबदारीही या तरुण पदाधिकाऱ्यांवर देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, महाविकास आघाडी म्हणून जर तिन्ही पक्षांनी निवडणुका लढवल्या तर प्रत्येकाच्या वाट्याला किमान ८० ते १०० जागा येणार आहेत. जर शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाल्यास दोन्ही पक्षाच्या वाट्याला १२० ते १४० जागा येऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीने जागावाटपात किमान शंभर जागा मिळतील या हिशोबाने १०० मतदारसंघावर लक्ष घातले आहे. ज्या मतदार संघात निसटता पराभव झाला असे मतदारसंघ, क्रमांक दोन आणि क्रमांक्तींची मते घेतलेल्या मतदार संघावर देखील राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!