Share

जम्बो लसीकरण मोहिमेत पालिका घेणार एनजीओंची मदत!

Published On: 

औरंगाबाद :कोरोनाच्या नियंत्रणासाठी औरंगाबाद शहरात लसीकरण करण्याची जम्बो मोहीम राबववली जात आहे. त्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे एक लाख कोरोना लसींची मागणी केली आहे. दरम्यान, सोमवारी एक दिवस पुरेेल एवढाच दहा हजार लसींचा साठा शिल्लक होता. सोमवारी पुन्हा ३० हजार लसींचा डोस पालिकेला मिळाला. त्यामुळे जम्बो मोहीम कायम ठेऊन यात एनजीओ, संस्थांची मदत घेणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

राज्यात कोरोना संसर्ग वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. औरंगाबाद शहरातही मागील चार दिवसांपासून मागणी करुनही लसींचा पुरवठा झालेला नव्हता. दरम्यान पालिकेने शहरात 5 एप्रिलपासून जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच रविवारपासून केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेचा महोत्सव सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. अशा स्थितीत पालिकेकडून पूर्ण शहरातील 115 वॉर्डात १२१ लसीकरण बुथ तयार करुन तेथे लसीकरण सुरु केले आहेत.

नेहमीपेक्षा आता तेथे लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शनिवारी ७ हजार ३६७ जणांनी लसींचा पहिला डोस घेतला आहे. यात आणखी वेग वाढणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. अशा परिस्थिती राज्य सरकारकडून सोमवारी ३० हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. हा साठा चार दिवस पुरेल एवढा असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

पालिकेने सध्या ११५ वॉर्डात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. यात वॉर्डातील माजी नगरसेवकांनी पुढाकार घेत नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करत आहे. तसेच त्यांनी जागा उपलब्ध करुन देण्यासह पथकांना खुर्ची, पाण्याची व्यवस्था, नोंदणीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले असल्याचे डॉ. पाळकर यांनी सांगितले.

शहरातील एनजीओ, संस्थांना आवाहन

लसीकरण मोहिमेसाठी मागणीच्या प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध झाल्यास मोहिमेला गती देण्यासाठी शहरातील विविध संस्था आणि एनजीओंची मदत घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सर्वांना आवाहन केले आहे. आतापर्यंत नगरसेवक आणि स्थानिक काही संस्था, व्यक्तींनी मदत झाली असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!