मुंबई : सोमवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४ धावांनी पराभव केला. विजय जरी पंजाब संघाने मिळवला असला तरी सगळीकडे चर्चा मात्र फक्त राजस्थानच्या संघाचा कर्णधार संजु सॅमसनच्या शतकी खेळीची होती. या सामन्यात संजु सॅमसनने ६३ चेंडुत ११९ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकार लगावले.
या खेळीनंतर संजु सॅमसन बद्दलचा एक जुना किस्सा सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. आयपीएलच्या २०१३ मधील मोसमात भारताचा माजी गोलंदाज श्रीसंतने भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडकडे संजु सॅमसनची शिफारस केली होती. यावेळी श्रीसंत म्हणाला होता की, ‘या खेळाडुने स्थानीक क्रिकेट स्पर्धेत माझ्या षटकात ६ षटकार लगावले होते. याला एकदा राजस्थानच्या संघासाठी खेळण्याची संधी दे’ असे म्हणत संजु सॅमसनची शिफारस केली होती.
In 2013 Sreesanth introduced Sanju to Dravid & jokingly said this 18 yr old boy smashed him for 6 sixes in an over in a local match & asked to consider him for Rajasthan Royals selections trials.
He has come a long way and he is their captain???? today.#RRvsPBKS#SanjuSamson pic.twitter.com/paFdhwcVNd— Amal Sudhakaran (@amal_sachinism) April 12, 2021
राहुल द्रविडने श्रीसंतच्या शिफारसीनुसार त्याला त्याच वर्षी राजस्थानकडून खेळण्याची संधी दिली आणि संजु सॅमसनचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले. २०१३ मध्ये द्रविड राजस्थान संघाचा कर्णधार होता. आपली मेहनत आणि कामगिरीच्या जोरावर संजूने स्वत:ला सिद्ध केले आणि हाच संजू आज राजस्थान संघाचा संघनायक बनला आहे.
महत्वाच्या बातम्या
- टीम इंडियाची अनोखी हॅटट्रिक; आयसीसी पुरस्कारात सलग तिसऱ्यांदा मारली बाजी
- ‘पुणे म्हाडा’च्या २८९० सदनिकांच्या सोडतीच्या प्रक्रियेचे उपमुख्यंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
- दिलासादायक! लातूर जिल्ह्यात आठवडाभर पुरेल इतक्या लस
- गरिबांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करा, सोनिया गांधींचे मोदींना पत्र
- चेहऱ्या ऐवजी केसांवर मास्क ; दिव्या दत्ता झाली हैराण, नेटकरी म्हणाले ‘वो स्त्री है…’


