Share

‘एसटी’चे आर्थिक चक्र अडकले निर्बंधांच्या चिखलात

Published On: 

औरंगाबाद : गतवर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आर्थिक फेऱ्यामधून एसटी बाहेर पडत नाही तोच पुन्हा एकदा कडक निर्बंधांच्या आर्थिक चिखलात एसटीचे चाक अडकले आहे. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे एसटी प्रशासनावर मोठा परिणाम झाला होता. हजारो कोटींचा भुर्दंड एसटीला सहन करावा लागला होता. आता पुन्हा एकदा वाढणारी रुग्ण संख्या पाहता कडक निर्बंधांमुळे औरंगाबाद एसटी विभागाला दररोज ३० ते ३५ लाखांचा तर महिनाभरात सरासरी १ कोटींपर्यंत नुकसान सोसावे लागत असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

पाच महिन्यांच्या खडतर लॉकडाऊन नंतर २० ऑगस्ट २०२० पासून एसटीची चाके रुळावर येण्यास सुरुवात झाली. मात्र सुरुवातीच्या काही दिवसात कोरोनाच्या भितीने प्रवाशांनी बसकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. पाच महिन्यात झालेले आर्थिक नुकसान भरत होते. मात्र मार्च महिन्यात रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली. शनिवार रविवार कडक लॉकडाऊन, अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आले. आता ब्रेक द चेन चे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाहतूकीला परवानगी असली तरीही बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे एसटी महामंडळावर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढावले आहे.

अनलॉक नंतरच्या काळात एसटी महामंडळाला औरंगाबाद विभागातून दररोज ५० ते ५५ लाखांच्या घरात कमाई होत होती. मात्र आता पुन्हा एकदा आपण लॉकडाऊनच्या वाटेवर आहोत. सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या परिस्थितीत सध्या एका दिवसात केवळ १५ ते २० एसटीला मिळत आहे. परभणी, नांदेडच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पुणे, जळगाव, नाशिकच्याही फेऱ्या सध्या प्रवांशाअभावी कमी करण्यात आलेल्या आहेत.
अरुण सिया, विभाग नियंत्रक

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!