मुंबई : लॉकडाऊन लावण्याआधीच भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या वर्षी मोंदीनी लॉकडाऊन लावले तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना? असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय.
या संदर्भात शेलार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘एक वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहीत नव्हता.. आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला. त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहचवली, धान्य, निवारा दिला! आज मजूरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत..रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार.. तेव्हा मा.मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?’
इतकेच नाही तर आजच्या परिस्थितीवरही त्यांनी ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ‘आज एक वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असे बरेच काही उपलब्ध आहे तेव्हा महाराष्ट्रातील तेच ‘हुषार’ सत्ताधारी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे सांगतात. आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाही, किंवा लॉकडाऊनला विरोधही करीत नाही, कारण जनतेचा जीव महत्वाचा!’ अशा वाक्यातून शेलार यांनी शालजोड्यातून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘राज्यात १२ ते १३ दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता; मात्र परप्रांतीयांनी गावी जाऊ नये, सरकार काळजी घेईल’
- गरिबांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करा, सोनिया गांधींचे मोदींना पत्र
- सोनाली कुलकर्णीने दिल्या गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा !
- मोदी हे ७० वर्षात देशाला लाभलेले अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर पंतप्रधान – नाना पटोले
- सचिन वाझे प्रकरणात नवा ट्वीस्ट, चौकशी करणाऱ्या NIAच्या IG शुक्लांची तडकाफडकी बदली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

