Share

जयंत पाटलांनंतर फडणवीसांची भर पावसात सभा; पंढरपुरात कोणाचा ‘पॅटर्न’ होणार सक्सेसफुल ?

Published On: 

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.

निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली असून विविध नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. महाविकास आघाडीसह भाजपासाठी ही निवडणूक महत्वाची असून नेत्यांच्या भाषणांची चर्चा महाराष्ट्रभर रंगत आहे. त्यामुले २ मे रोजी लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा असतील. दरम्यान, २०१९ विधानसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातील सभा ही ऐतिहासिक ठरली आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्ष काँग्रेसला याचा मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं होतं.

आता पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी देखील पुन्हा एकदा या पॅटर्नची पुनरावृती होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला वरुणराजाने हजेरी लावली आणि उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. आता, या दोन्ही नेत्यांचे व्हिडीओ, फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत.

जयंत पाटील यांची भर पावसातील सभा –

११ एप्रिल रोजी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीनिमित्ताने भगीरथ भारत नाना भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेतली. यावेळी सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली होती. वरुणराजासह मंगळवेढ्यातील जनतेचा उत्साह ही शिगेला पोहोचला होता. यावेळी जयंत पाटील यांनी भर पावसात सभा घेत विरोधकांवर हल्लाबोल केला.

पाटील म्हणाले, मी जलसंपदा मंत्री झालो व आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला २ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला.इथल्या खासदारांनी गाव दत्तक घेतलं असं कळलं पण कधी इथे फिरकले नाही. भगीरथ भालके यांच्या नेतृत्वात पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा मानस आहे.

सत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागलं आहे. पाण्याविना मासा तडफडतो तशी भाजपची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करून भालके यांना विजयी करा. भारत नानांचा हा मुलगा, पवार साहेबांच्या आशीर्वादाने या मतदारसंघासाठी आधुनिक भगीरथ ठरेल! असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वादळी वाऱ्यासह वरुणराजाचं आगमन –

१२ एप्रिल रोजी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात प्रचारसभांचा धुमधडाकाच लावला होता. त्यांनी एकाच दिवशी या एकाच मतदारसंघात तब्बल ६ प्रचारसभा घेऊन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी, संध्याकाळच्या एका सभेआधीच पावसाचे वातावरण तयार झाले होते.

खासदार रणजित नाईक निंबाळकर त्यांच्या भाषणात म्हणाले कि ‘देवेंद्रजी आता पावसात सभा घेण्याची तुमची वेळ आहे.’ याला उत्तर देत देवेंद्र फाणवीस म्हणाले कि ‘आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही.’ फडणवीसांच्या या वक्तव्यावर उपस्थितीतांनी चांगलीच दाद दिल्याचे देखील पाहायला मिळाली.

यावेळी त्यांनी सभेत भाषण करताना पुन्हा एकदा सत्तापालटावर सूचक विधान केलं आहे. ‘केवळ एका मतदारसंघाची निवडणूक आहे, याने काय फरक पडणार आहे ? याने काय सरकार बदलतंय का ? असे सवाल केले जात आहेत. सरकार कधी बदलायच ते माझ्यावर सोडा, ते बदलू आपण. तुम्ही समाधान आवताडेंना विजयी करा, तिकडे मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’ असं विधान फडणवीसांनी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

शरद पवारांच्या सातारच्या सभेची आठवण !

१८ऑक्टोबर २०१९ रोजी सातारा येथे भर पावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा प्रचंड गाजली होती. त्या सभेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाले होते. आता पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणांगणासह राज्यातील वातावरण तापलं असतानाच जयंत पाटील यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कार्यकर्त्यांमधील उत्साह शिगेला गेला असून कोणाचा ‘पॅटर्न’ सक्सेसफुल होणार ? याच्या चर्चा गावोगावी रंगल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!