Share

बहुप्रतीक्षित चित्रपट पठाण ‘या’ दिवशी होणार रिलीज

Published On: 

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख शेवटचा झिरो चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. त्यानंतर शाहरुखच्या कोणताही चित्रपट आला नव्हता. त्यामुळे आता त्याचे चाहते त्याच्या कमबॅकची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी आता गुड न्यूज आहे. तब्बल दोन वर्षानंतर आता शाहरूख कमबॅक करतो आहे. त्याने एक नाही 2 नाही तब्बल तीन चित्रपट साईन केले आहेत.

शाहरुख खानलवकरच पठाण सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यानंतर तो राजकुमार हिरानी आणि एका दाक्षिणात्य फिल्ममेकरच्या चित्रपटातही काम करणार आहे. एकीकडे शाहरूखच्या पठाण चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असताना शाहरुख खान पहिल्यांदाच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील दिग्दर्शक एटली यांच्यासोबत काम करणार आहे. या सिनेमामध्ये शाहरुखचा डबल रोल असेल. या आधी त्याने ड्युप्लीकेट आणि डॉन या सिनेमांमध्ये डबल रोल साकारला होता. त्यानंतर आता तिसऱ्यांदा शाहरूख डबल रोल करणार आहे. यामध्ये शाहरुख मुलगा आणि वडीलांची भूमिका साकारणार आहे. 2 पिढ्यांमधील अंतर हा विषय या सिनेमामध्ये हाताळला जाणार आहे.

शाहरुख खानचा हेरगिरीच्या मुद्द्यावरील बहुचर्चित ‘पठाण’ पुढच्यावर्षी ईदच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. लॉकडाऊनचे निर्बंध आता उठवले गेल्यामुळे या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले आहे. यशराजच्या स्टुडिओमध्ये ‘पठाण’च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. पुढील 18 दिवस हे शूटिंग सुरू राहणार आहे. ‘पठाण’ 2021 च्या ईदला रिलीज होणार होता. आता ‘पठाण’ 2022 च्या ईदला रिलीज झाल्यावर त्याचे हे कमबॅक किती यशस्वी झाले हे समजेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!