इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या पराभवामुळे कोट्यावधी भारतीय चाहत्यांची मने मोडली. या महान सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या विजयाबद्दल मोठे दावे केले जात होते. पण डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले.
या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे. इंग्लंड संघासोबतच्या कसोटी मालिकेसाठी बराच वेळ शिल्लक असल्यामुळे भारतीय संघ आता तीन आठवड्यांच्या सुट्टीवर असेल 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जी चूक टीम इंडियाने केली ही चूक दुरुस्त करण्यासाठी महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी टीम इंडियाला सल्ला दिला आहे. या दौऱ्यात भारतीय टीम त्यांच्या ओपनरमध्येच बदल करू शकते, असं गावसकरांना वाटतं. भारतीय टीम मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया सीरिजपासून रोहित शर्मा आणि शुभमन गिलसोबत खेळत आहे, पण गावसकर यांच्या मते 21 वर्षांच्या शुभमन गिलच्या तंत्रामध्ये काही त्रुटी आहेत.
स्पोर्ट्स तकशी बोलताना गावसकर म्हणाले, ‘मयंक अग्रवालने भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. दोन वेळा त्याने ओपनिंग करत द्विशतक झळकावलं. इंग्लंड सीरिजआधी बीसीसीआयने काही सराव सामन्यांचा आग्रह धरला आहे, यातून गिल ओपनिंग करणार का अग्रवाल हे स्पष्ट होईल. ‘सराव सामन्यात गिल आणि मयंक या दोघांना ओपनिंगला पाठवलं जाऊ शकतं आणि रोहितला आराम दिला जाईल, यामुळे दोघांपैकी इंग्लंडच्या परिस्थितीत कोण चांगला खेळेल, याचा अंदाज येईल,’ अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप


