मुंबई : जुलैमध्ये टीम इंडिया श्रीलंकेचा दौरा करणार आहे. 13 जुलैपासून सुरू झालेला हा दौरा 25 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल.
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम मुंबईमध्ये पोहचली आहे. श्रीलंकेला जाणारी टीम मुंबईत आपला विलगीकरण कालावधी पूर्ण करत आहे. त्यासोबतच श्रीलंका दौऱ्याची जोरदार तयारी देखील करत आहेत. खेळाडूंना एकत्र येऊन सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे खेळाडू जिम सेशनमध्ये घाम गाळताना दिसून येत आहेत.
श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या शिखर धवनने मत व्यक्त केलं आहे. ‘आगामी मालिका आव्हान असून दुय्यम दर्जाच्या खेळाडूंना आपले कौशल्य दाखवित मुख्य संघात स्थान मिळविण्याची संधी मिळेल, तसेच उपस्थितीत संघ रवाना होण्यापूर्वी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘हा चांगला संघ आहे. आमच्या संघात सकारात्मक व विश्वास आहे. प्रत्येकाला चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे. खेळाडू उत्साहित आहेत. हे नवे आव्हान आहे, पण त्याचसोबत आम्हा सर्वांसाठी आपले कौशल्य दाखविण्याची शानदार संधी आहे. नियमित कर्णधार विराट कोहली व मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे धवन श्रीलंकेविरुद्ध पुढील महिन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भुवनेश्वर कुमार संघाचा उपकर्णधार राहील.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

