मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमी चर्चेत असते. तिच्या एक्स बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर देखील तिने काही पोस्ट केल्या होत्या, ज्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आल्या होत्या. सध्या अंकिता लोखंडेची ‘बिग बॉस’च्या १५व्या पर्वामध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याबाबत आता तिने स्वतः खुलासा केला आहे.
यावर अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ती ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या पोस्टमध्ये ती म्हणाली, ‘अनेक मीडिया रिपोर्टसमध्ये अशा बातम्या येत आहेत की मी यावर्षी ‘बिग बॉस’ शोमध्ये सहभागी होणार आहे.’
https://www.instagram.com/p/CQnrE66rxs0/?utm_source=ig_embed&ig_rid=6d7e6281-41e9-44aa-b6a6-e47d6d460447
पुढे ती म्हणाली की, मला वाटतं मीडिया आणि सर्वांनी हे नोट करावं की मी बिग बॉस या शोमध्ये सामील होणार नाही. या शोमध्ये मी सहभाग घेणार असल्याचं वृत्त खोटं आहे. मी अशा कोणत्याच गोष्टीचा भाग होणार नाही असे असताना लोकांनी लगेचच मला व्देषपूर्ण प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.’
‘बिग बॉस १५’मध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. या दोघी एकत्र दिसणार म्हणून अनेक नेटकऱ्यानी यावर विविधी प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र यावर अंकिताने स्वतः पुढे येत या चर्चाना उत्तर दिले आहे.
अंकिता इंस्टग्रामवर व्हिडीओ शिवाय काही हॉट फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंनादेखील चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. या फोटोवर देखील चाहते भरभरून कमेंट करत असतात.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

