Share

‘सगळ्यांना संधी देणं शक्य नाही’ ; प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर द्रविडची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : श्रीलंका दौर्‍यासाठी अनुभवी फलंदाज राहुल द्रविड यांची प्रशिक्षक पदी निवड झाली. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री इंग्लंडमधील विराट कोहलीच्या टीममध्ये व्यस्त असतील. यामुळे राहुल द्रविड हा द्वितीय श्रेणीतील भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार आहेत. 2014 मध्ये राहुल द्रविड यांची इंग्लंड दौर्‍यावर भारतीय संघाचे फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आली होती.

भारत या काळात एकाच वेळी दोन मालिका खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौर्‍यावर आहे. तिथे टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर शिखर धवनच्या नेतृत्वात आणखी एक भारतीय संघ श्रीलंकेत 13 ते 25 जुलै दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन टी -20 मालिका खेळेल. इंग्लंड दौर्‍याचा भाग नसलेल्या या खेळाडूंना श्रीलंका दौर्‍यासाठी जागा मिळाली आहे.

या दौऱ्यावर जाण्याआधी टीमचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड हे युवा खेळाडू चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. वर्ल्ड कपसाठी खेळाडूंची निवड करणं निवड समितीचं काम आहे, या दौऱ्यावर युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर त्यांना मदत मिळेल. जर तुम्ही या स्तरावर चांगली कामगिरी केलीत, तर नक्कीच निवड समितीचं लक्ष वेधून घ्याल,’ असं राहुल द्रविड म्हणाला. तसंच 6 मॅचच्या या सीरिजमध्ये सगळ्यांना संधी देणं शक्य नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं  आहे.

पुढे ते म्हणाले, ‘टीममध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचं चांगलं मिश्रण आहे. एका प्रशिक्षकासाठी हे रोमांचक आहे, यामुळे सगळ्यांना काहीतरी शिकायची संधी आहे. प्रशिक्षक म्हणून यातून मलाही अनुभव मिळेल, तसंच शिकायची आणि सुधारायचीही संधी असेल, त्यामुळे मी देखील उत्साही आहे,’ असं द्रविडने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!