मुंबई : जुलैमध्ये टीम इंडिया श्रीलंकेचा दौरा करणार आहे. 13 जुलैपासून सुरू झालेला हा दौरा 25 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल.
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम मुंबईमध्ये पोहचली आहे. श्रीलंकेला जाणारी टीम मुंबईत आपला विलगीकरण कालावधी पूर्ण करत आहे. त्यासोबतच श्रीलंका दौऱ्याची जोरदार तयारी देखील करत आहेत. खेळाडूंना एकत्र येऊन सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे खेळाडू जिम सेशनमध्ये घाम गाळताना दिसून येत आहेत.
श्रीलंका दौऱ्यावर संघ रवाना होण्यापूर्वी व्हर्च्युअल पत्रकार परिषदे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये धवन आणि राहुल द्रविड यांनी भाग घेतला. द्रविड म्हणाले की, श्रीलंकेविरुद्ध 13 जुलै रोजी वनडे सामन्याने मालिकेची सुरुवात होईल आणि त्यानंतर 21 जुलैपासून टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाईल. पहिल्या संघाप्रमाणेच शिखर धवनच्या नेतृत्वात द्विपक्षीय मालिका जिंकण्याचे उद्दिष्ट असल्याचे द्रविडने सांगितले.
What does the #SLvIND limited-overs series mean for everyone involved with the Indian team? ????
Here's what Rahul Dravid – #TeamIndia Head Coach for the Sri Lanka series – has to say ???? ???? pic.twitter.com/ObUgFdhStj
— BCCI (@BCCI) June 27, 2021
‘बरेच खेळाडू आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी आपली जागा निश्चित करू पाहत आहेत. तेथे काही खेळाडू असतील जे स्थानांसाठी जोर देत आहेत. परंतु आतापर्यंत आम्ही ज्या दोन सत्रांत होतो त्यातील मुख्य विषय मालिका जिंकण्यावर आहे. ते आमचे प्राथमिक उद्दीष्ट असणार आहे. पण आशा आहे की, मालिका जिंकताना खेळाडूंना काही चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल आणि निवड समितीचे दरवाजे ठोठावतील.’ द्रविड पुढे म्हणाला की आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ आधीच निश्चित झाला आहे पण तेथे 2-3 खेळाडूंना जागा मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

