मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. मात्र यावर अद्याप काही तोडगा काढण्यात आलेला नाही. तसेच नांदेड, मालेगाव, अमरावती येथे धर्मांध मुस्लिमांनी नंगा नाच घातला. राज्यात हे सर्व घडत असताना सामना अग्रलेखातून कंगना रनौतच्या वादग्रस्त वक्तव्यावर लिखाण केले आहे. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.
एसटी कर्मचारी आत्महत्या करताहेत, त्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. नांदेड, मालेगाव, अमरावती येथे धर्मांध मुस्लिमांनी नंगा नाच घातला आहे आणि सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र एका नटीवर अग्रलेख लिहिते आहे. मुर्दाड राज्यकर्ते. pic.twitter.com/STy0LO5RgF
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 13, 2021
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत लिहिले की, एसटी कर्मचारी आत्महत्या करताहेत, त्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. नांदेड, मालेगाव, अमरावती येथे धर्मांध मुस्लिमांनी नंगा नाच घातला आहे आणि सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र एका नटीवर अग्रलेख लिहिते आहे. मुर्दाड राज्यकर्ते, असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील त्रिपुरात समाजबांधवांवर अत्याचार आणि प्रार्थनास्थळांची नासधूस या घटनांच्या निषेधासाठी मुस्लीम समाजाच्या वतीने शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चादरम्यान चित्रा चौक ते मालवीय चौकादरम्यान काही दुकानांवर दगडफेक करून वाहनांची नासधूस करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दगडफेकीत तीन जण जखमी झाले. यानंतर येथील दुकाने बंद करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; सेना-राष्ट्रवादीलाही यश, काँग्रेस मात्र…
- ‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’


