🕒 1 min read
मुंबई : ‘भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’, अशी मुक्ताफळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली आहेत. कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर तिच्या वक्तव्यावरुन संतापाची लाट उसळली आहे. तसेच तिला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत, अशी देखील मागणी होताना दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कंगनावर टीका करत तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का? स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणारे मोदी आणि महाराष्ट्रातील त्यांचे देशभक्त नेते अजूनपर्यंत का गप्प आहेत?, असा खोचक सवाल अमोल मिटकरींनी केला आहे.
कंगनाच्या सौदंर्या समोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणारे मोदी व महाराष्ट्रातील त्यांचे देशभक्त नेते अजून पर्यंत का गप्प आहेत?@PMOIndia@FADAN@mipravindarekar@KiritSomaiya@SMungantiwar
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 12, 2021
दरम्यान, कंगना रानौतच्या म्हण्यानुसार देशाला १९४७ मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले. ह्या कंगुबाईने केलेलं हे वक्तव्य देशासाठी बलिदान देणाऱ्या तमाम देशभक्तांचा अपमान असून या बाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
- भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराच्या नावाखाली मोठी जमीन हडपली; मलिकांचा खळबळजनक आरोप
- ‘आधी 150 रुपये वाढवायचे नंतर रुपया, सव्वा रुपया कमी करायचे, हे धंदे बंद करा’
- ‘ऐन दिवाळीत २ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
